The Law of Conservation of Energy

*खणेपुरी-108 कोटी नामस्मरण* *मंदीराच्या दगडातून नामस्मरणाच्या ध्वनी लहरी*

*वातावरणात प्रक्षेपित होण्याचे*

 *वैज्ञानिक कारण ….*

————-

     *फ्रांस च्या इमिली डु चटली* या वैज्ञानिक महिलेने आयझक न्यूटन यांच्या the laws of motion अर्थात गतीज उर्जा यावर संशोधन करून *उर्जा अक्षयतेचा नियम शोधून काढला* हा उर्जा अक्षयतेचा नियम – The law of conservation of energy

या नावाने भौतिक शास्त्रात प्रसिद्ध आहे. हा नियम असे सांगतो की – Energy can neither be created nor be destroyed. Although, it may be transferred from one form to another.If you take all forms of energy into account, the total energy of an isolated system always remains constant. 

*भौतिक शास्त्रातील*

  ————–

 या नियमानुसार उर्जा ही नवीन निर्माण होत नाही अथवा ती नष्ट ही होत नाही. ती फक्त एका स्वरूपातून दुसर्या स्वरूपात रूपांतरित होते.

    *ध्वनी ही एक उर्जा आहे.*

     ——————

    ही उर्जा कधीच नष्ट होत नाही. ती फक्त एका रूपातून दुसर्या रूपात रूपांतरित होते. उदा. Sound energy ध्वनी उर्जा. आपण मोबाईल वर बोलत असताना आपला आवाज सूक्ष्म अदृश्य लहरींमध्ये रूपांतरीत होतो. या वेव्हज अनेक मैल प्रवास करून अदृश्य रूपाने दुसर्या मोबाईल मध्ये पोचतात व तेथे त्या लहरींचे पुन्हा ध्वनी उर्जेत रूपांतर होऊन आवाज ऐकू येतो. व आपले मोबाईलवर बोलने होते. अशाप्रकारे ध्वनी उर्जा कधीच नष्ट होत नाही तर ती फक्त एका स्वरूपातून दुसर्या स्वरुपात रूपांतरीत होते. 

       इमिली डू चटली या वैज्ञानिक महिलेने केलेल्या संशोधनातूनच पुढे रेडीओचा शोध लागला. उंच आकाशवाणी टावर वर ध्वनी उर्जा सूक्ष्म प्रकाश लहरीत रूपांतरीत करुन प्रक्षेपित केल्या जाऊ लागल्या व रेडिओवर त्या सूक्ष्म लहरींचे ध्वनी उर्जेत रूपांतर होऊन रेडीओत बातम्या ऐकायला येऊ लागल्या ….

   *खणेपुरी येथील*

    ————

   108 कोटी नामस्मरण मंदीरातील दगडातून नामस्मरणाच्या पवित्र ध्वनी लहरी वातावरणात प्रक्षेपित होत आहेत. त्याचेही हेच वैज्ञानिक कारण आहे. त्यामुळे मंदीराचे नामस्मरणीय दगडातून वातावरणात सात्विक नामस्मरणीय उर्जा प्रक्षेपित होत असल्याचे जाणवत आहे.

     *एखादा नामस्मरण साधक*

      ——————-

       जर प्रातकाळी 3 ते 6 या कालावधीत एकाग्र होऊन धीरे धीरे मंद मंद आवाजात नामोच्चार करून नामस्मरण करीत असेल तर त्याचे शरीरातून नामोच्चाराची ध्वनी उर्जा त्याचे सभोवती प्रक्षेपित होऊन संपर्कातील वस्तू उदा. बसायचे आसन पायातील वाहाना , संपर्कात येणारे पशू पक्षी माणसे इ. सत्वगुणाच्या लहरीने ओतप्रोत होऊन जातात. नामस्मरणाचा ध्वनी energy – कधीच नाश पावत नाही ती पुढे पुढेच जात असते.

    *मंदीरात घंटा वाजविली*

     ——————

      असता ध्वनीचे आवर्तनाच्या लहरी अनंत अंतरापर्यंत जातात, तळ्यातील पाण्यात दगड टाकला असता पाण्यावर गोलाकार उठणारे तरंगही जसे अनंत अंतरापर्यंत चालतात ते कधीच नष्ट पावत नाहीत. तसे नामस्मरण ध्वनीचे तरंग लहरी वातावरणात सतत प्रक्षेपित होत असतात….

        ज्याप्रमाणे एखादा उपग्रह अवकाशात पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण शक्तीचे पलीकडे प्रक्षेपित केला व त्याला गती दिली असता तो उपग्रह अवकाशात अनंत काळ फिरतच राहतो… तद्वतच –

   *मार्गशीर्ष मास सार्वत्रिक*

    ——————

       महाजपयज्ञात 12 वर्ष नामस्मरण करणार्या हजारो नामस्मरण साधकाचे नामस्मरण ध्वनी तसेच पांचाळेश्वर येथे गोदावरी गंगेच्या पात्रात बसून दि.16 /01/ 2014 रोजी सव्वा लाख लोकांनी एकाच वेळी श्री पंचकृष्णाचे नामस्मरण केले. सव्वा लाख लोकांचे ह्रदयातून निघालेला नामस्मरणाचा मंद मंद ध्वनी ही उर्जा नष्ट न होता अनंत काळपर्यंत वातावरणात प्रक्षेपित होत आहे. तीच नामस्मरणाची ध्वनी उर्जा नामस्मरणीय पवित्र दगडा द्वारे खणेपुरी येथील 108 कोटी नामस्मरण नामस्मरण मंदीरात केंद्रित होउन जोपर्यंत हे मंदीर आहे व दगडे आहेत तोपर्यंत ही नामस्मरणाची उर्जा या नामस्मरण मंदीराद्वारे वातावरणात प्रक्षेपित होत राहणार आहे. भविष्यात खणेपुरी येथील हे 108 कोटी नामस्मरण मंदीर, आत्मशांती, आत्मबळ, ईश्वरीय प्रेरणेचे व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपाशिर्वादाचे केंद्र बनणार हे निश्चित…

     12 वर्षीय मार्गशीर्ष मास सार्वत्रिक महाजपयज्ञातील हजारो श्रद्धावानांनी गोदावरी गंगेच्या पात्रात केलेले सामुहिक एक तासाचे नामस्मरण व खणेपुरी येथील 108 नामस्मरणाचे मंदीर महानुभाव पंथाचे दीपस्तंभ बनून अक्षय उर्जेचे प्रेरणा स्त्रोत म्हणून समाजात वंदनीय असेल …

– *108 कोटी नामस्मरणाचार्य*

   *महंत श्री प्रज्ञासागरबाबा महानुभाव*  

    *108 कोटी नामस्मरण मंदीर*

    *खणेपुरी,मो. 9850448501*

Leave a Comment