Pitru Dosh Nashak Sarvadnya Shri Chakradhar Stotra

*पितृदोष नाशक श्रीचक्रधर स्तोत्र*

*श्री चक्रधराय नम: श्री पंचावताराय नम:*

*श्री खणेपुरी तीर्थ स्थानाय नम :*

——————–

*नमो निराकार निर्गुणा ।* 

*नमो अनंता शक्ती सगुणा ।* 

*नमो मायापुर धारणा ।* 

*कृपा करावी जग जीवना ।।१।।* 

*दया मया कृपा करुणा ।* 

*सकळ सिध्दी तुझ्या चरना ।* 

*जीवांचे दुःख तुज पहावेना ।* 

*कृपा करी दयाघना ।।२ //* 

*अनंत ब्रम्हांड नायीकेचा नायक तु ।* 

*अनंत गुणधर्म शक्तीयुक्त तु ।* 

*भरवसनगरी व्यक्तलास तु ।* 

*श्रीचक्रधर नाम अंगीकरुनी ।।३।।* 

*दुःखी जीवांचा करावया उध्दार ।* 

*खणेपुरी आलासी धावुन ।* 

*लीळा चमत्कार दाखवुन ।* 

*जना वेधीले दयाघना ।।४ ।।* 

*कार्तिक शुध्द तृतियेला ।* 

*खणेपुरी घडली अद्भूत लीळा ।* 

*दुःखी जीवा उध्दरावया ।*

*आला कैवल्यरायो ।।५।।* 

*जय जयाजी श्रीचक्रधरा ।* 

*तुमची चांपेगौर श्रीमुर्ती ।* 

*दर्शनमात्रे जनासी वेधीती ।* 

*वार्ता गेली ग्रामाला ।।६।।* 

*खणेपुरीच्या शिवारात ।* 

*काटियेतळी एकांतात ।* 

*लखुदेवबासी सांगतो मात ।* 

*ऐकोनी अवधे झाले चकित ।।७।।* 

*ग्रामस्थ लागती चरणाला ।* 

*भारध्वज पक्षी तोही वेधला ।* 

*वार्ता गेली चहू दिशाला ।* 

*लोक धावती दर्शनाला ।।८।।*

*मर्दना मादणे स्नान घालीती ।* 

*चंदणाची उटी लाविती ।* 

*पुष्प माळा गळा घालीती ।* 

*ओवाळीती पंचदीप ।।९।।* 

*बाईसा म्हणती बाबा ।* 

*स्वीकारावीजी आरोगणा ।* 

*म्हणती नाथोबाशी भीक्षा आणा ।* 

*दहिभात आरोगिले ।।१०।।* 

*ऐशी घडली अद्भूत लीळा ।* 

*भक्तीजन लागती चरणाला ।* 

*देव खणेपुरीसी प्रगटला।* 

*दुःख निवारण करण्याला ।।११।।* 

*जनाचे पाहुनी दुःख दैन्य ।*

 *कळवळलाशी तू दयाघन ।* 

*दोष उदरी सामावून ।* 

*जीव उध्दरण्याशी प्रर्वतला ।।१२।।* 

*हा अवघा जनु ठकलेला ।* 

*तू आलाशी फेडण्याला ।* 

*मी दुःखाने गांजलेला ।* 

*माय बापा चक्रधरा ।।१३।।* 

*मी पामर दुःखिस्त ।* 

*हीन दीन अधम पतित ।* 

*पितृ दोषाने झालो त्रस्त ।* 

*माय बापा चक्रधरा ।।१४।।* 

*संसार दुःखाचे रडगाणे ।* 

*गाऊनी मागतो तुज मागने ।* 

*तू माय बाप दयाळू पणे ।* 

*देशील ते घेईल संतोषाने ।।१५।।* 

*काय सांगू माझी व्यथा ।* 

*देवा तू सर्व असे जाणता ।* 

*रंजल्या गांजल्यांची तू माता ।* 

*तू माहेर जीवांचे ।।१६।।* 

*देवा माझे दुःख अमित ।* 

*दारिद्र्याने झालो पिडीत ।* 

*परिवाराची झाली वाताहत ।* 

*पितृ दोषे भंगलो ।।१७।।* 

*घर नाही राहावेया ।* 

*अन्न नाही खावया ।* 

*वस्त्र नाही नेसावया ।* 

*तू जननी पाहे मज ।।१८।।* 

*माझ्या दुःखाला मीच कारण ।* 

*तुज बोल काय विनाकारण* 

*पुर्वजन्मीचे माझेच कर्म हीन* 

*म्हणून दुःखाते पावलो ।।१९।।* 

*चक्रधरा तू माय माऊली ।* 

*देई मला कृपा सावली ।*

*शांत करी अंतरीची काहिली ।* 

*चरणी देई आसरा ।।२०।।*

*तुझी किर्ती ऐकूनी ।* 

*कानसेचा ब्राम्हण आला धावूनी ।*

*पुत्र आयुष्य धन देऊनी ।* 

*त्याला जीवनी सुखी केले ।।२१।।*

*तैसे मज सुखी करावे ।* 

*माझे दैन्य दुःख फेडावे ।*

*माझेया परिवाराशी रक्षावे ।* 

*कृष्णनाथा चक्रधरा ।।२२।।*

*सकळांचा तू गोसावी चक्रधारी ।* 

*खणेपुरीशी राज्य करी ।*

*तुझे भारध्वजा वेध स्थान ।* 

*सर्व सुखाचे निधान ।।२३।।* 

*जे खणेपुरीसी जाती दर्शना ।* 

*त्यांचे पाप होई भंजणा ।* 

*ते सुखी होती जीवना ।* 

*सर्वही दोष नासती ।।२४।।* 

*आणि काळसर्प अति दारुण ।* 

*ग्रासावया करी आक्रमण ।* 

*त्याचेही करी निवारण ।* 

*भारध्वजा वेधू स्थान ।।२५।।* 

*मनी धरुनी भक्ती भाव ।* 

*विडाअवसर करी समर्पण ।* 

*त्यांचे विघ्न होई निवारण ।* 

*अतृप्त होई शांत ।। २६ ।।* 

*माझा पितृ दोष नासावेजी ।* 

*मला यश सिध्दी द्यावेजी ।* 

*कु-विद्ये पासौनी मज रक्षावेजी ।*

 *भारध्वजा वेधका ।। २७।।* 

*जो पंचरुप आनी आपुल्या ध्यानी ।*

 *लीळा आठवी एकाग्र होऊनी* 

*सकळ मनोरथ पुरवी चक्रपाणी ।* 

*रक्षिता समर्थ ।। २८ ।।* 

*अष्टोदशे विडे अर्पण करुन ।* 

*श्रीचक्रधर स्तोत्र करी पठण ।* 

*तयाचा पितृदोष नासून* 

*तो सुखी होय ।। २९।।* 

*त्याच्या परिवाराची फिटेल भ्रांत।* 

*यश मिळेल त्याला निश्चींत ।* 

*दारीद्रय फिटून तो श्रीमंत ।* 

*होईल जाणा ।।३०।।* 

*म्हणौनी नित्यदिनी करावे पठण।* 

*मग करावे अन्नोदक सेवन ।* 

*श्रध्दाभाव मनी धरुन ।* 

*भजावे पंचकृष्णाते ।।३१।।* 

*गुरुशी आनुन आपुल्या घरी ।* 

*त्याशी भजावे तन मन धनानी ।* 

*त्याची प्रसन्नता लाभलेया ।* 

*पावे चक्रपाणी ।।३२।।* 

*इती श्री पितृदोष नाशक श्री चक्रधर स्तोत्र । रचयीता प्रज्ञासागर महानुभावीय महंत । विश्वशांती नामस्मरण आत्मतीर्थ गंगातीर । श्री खणेपुरीचे महास्थान की जय ।*

Leave a Comment