Verse-1_Adhyay_1_Rahasyartha Chandrika_Shree Geeta Teeka_The Message of the Immortal Love

www.youtube.com/@RahasyarthaChandrika

अध्याय पहिला

अथ प्रथमोऽध्यायः

धृतराष्ट्र उवाच-

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ।।१ ।।

धृतराष्ट्र उवाच – धृतराष्ट्र म्हणाला.

संजय – हे संजया ! धर्मक्षेत्रे’- पुण्यभूमी, कुरुक्षेत्रे- कुरुक्षेत्रात, समवेताः एकत्रित झालेल्या (व), युयुत्सवः युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाः माझ्या, च-आणि, पाण्डवाः – पंडुच्या पुत्रांनी, एव देखील, किम् – काय, अकुर्वत केले ?

भावार्थ

युद्ध टाळून दुर्योधनाचे साम्राज्य टिकवावे म्हणून पांडवांची समज घालुन त्यांना युद्धापासून पराड. मुख करण्याकरिता एकदा धृतराष्ट्राने संजयाला पाठविले होते. अशी कथा महाभारतात उद्योगपर्वाच्या संजययान नामक पर्वात येते. त्याला वाटत होते पांडव धार्मिक आहेत. त्या उपदेशवचनांचा त्यांच्यावर अवश्य प्रभाव पडला असेल; तसेच युद्ध पुण्यभूमी कुरुक्षेत्रात होणार म्हणून युद्धाच्या अनिष्ट परिणामाकडे लक्ष देऊन कदाचित् ते ऐनवेळीसुद्धा त्यापासून परावृत्त होतील. पण जर का पांडवांनी युद्धच करण्याचे ठरविले तर मात्र पांडवांचा विजय होऊन आपल्या पुत्राचे साम्राज्य रसातळाला जाईल, या भीतीने अत्यन्त व्याकुळतेने धृतराष्ट्र संजयाला म्हणाला, ‘संजया पुण्यभूमी कुरुक्षेत्रात युद्ध करण्याच्या इच्छेने जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी, म्हणजे कौरव-पांडवांनी काय केले? युद्धाचा आरंभ किंवा शिष्टाई ?

संबंध

१. या ठिकाणी युद्ध करणारांना व तपश्चर्या करणारांना स्वर्गप्राप्ती होईल, असा कुरु राजाला वर मिळाला होता. अशी कथा महाभारताच्या वनपर्व व शल्यपर्वात येते. म्हणूनच महाभारताकाळी हे स्थान धर्मक्षेत्र म्हणून प्रसिद्धीला आले असावे; जसे गोदावरी, गंगा व भागिरथी गंगेचे काठ- हल्लीदेखील पुण्य -भूमि म्हणून प्रसिद्ध आहेत.

दुसरे धर्मक्षेत्रे म्हणजे पुण्य तथा पाप यांच्या निप्पत्तीचे स्थान, म्हणजेच कर्मभूमी.

१९६

Leave a Comment